॥ पुण्यसमरण ॥

२३ एप्रिल २०२२

 

२३ एप्रिल हा दिवस आदरणीय श्री.नवरे गुरुजींचा प्रयाणदिन. ह्या दिवशी सर्व वर्गात त्यांचा आवडता १६वा अध्याय म्हणुन त्यांच्या आठवणी सांगितल्या जातात.गेली २वर्षे फोन वरुन हेच केले जात होते. ह्या वर्षी निर्बंध शिथिल झाल्यामुळे न्यासाच्या विश्वस्त डॉ.विनीता केतकर ह्यानी सर्व शिक्षकांसाठी प्रीती भोजन आयोजित केले होते. त्या दिवशी त्यांनी आपल्या वडिलांच्या थोर (गुरुजींच्या) कार्याचा परिचय सर्वांना करुन दिला.देववाणी १पुस्तकाचे प्रकाशन, गीतावर्गांची सुरुवात,हर्डी येथील गीतामंदिराचे बांधकाम, न्यासाचे उपक्रम ह्याविषयीच्या सर्व आठवणी लॅपटॉपच्या स्क्रीनवर दाखवल्या. सर्वांनी मोकळेपणाने एकमेकांना आपल्या वर्गांची माहिती दिली.

मेट्कोने न्यासाला दिलेली ट्रॉफी श्री. व सौ. महाजनांनी सर्वांना दाखवली. ठाणे येथील समारंभात आलेले अनुभव सांगितले.

कोविडमध्ये मोलाची मदत केलेल्या मुलांचा तसेच एका (दातार)देणगीदारांचा परिचय करुन दिला.

कार्यक्रमात ६व१६ अध्यायांचे पठण झाले.भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.सर्वांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.. कार्यक्रमाला सर्व नवरे कुटुंबीय, १५शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रम न्यासाच्या 'बालाजी दर्शन 'इमारतीत संपन्न झाला.


| गीता जयंती |

 

दि. १४डिसेंबर ह्या दिवशी गीता जयंती होती. श्री गोविंदांनंद न्यासातर्फे हा दिवस बदलापूरला श्री मुळेंच्या फार्म हाऊसवर साजरा केला.

सकाळी ९वा. सुमारे ४७जण बसने ,काहीजण ट्रेनने तर काहीजण आपल्या गाडीने असे ८०जण ११वा.जमले होते. बस मधून जाताना भजने गाणी म्हणत सर्वांनी प्रवासाचा आनंद लुटला. टिप-या, टाळ्यांचा गजर,फेर धरून आनंदाने औदुंबर वास्तुत प्रवेश केला.

११.३०वा. गीतापठणास सुरुवात केली. २.३०पर्यंत सर्वांनी एका सुरात केलेल्याशुद्ध गीता पठणाने वातावरण भारून गेले. आरती पसायदानानंतर सर्वांनी प्रसादाचा आस्वाद घेतला.परिसरात फिरुन सर्वांनी फोटो, झोपाळा, नदीकाठ ह्याची मजा लुटली.

४वा. सौ. मनाली सप्रे(पूर्वाश्रमीच्या मोहिनी दाजीशास्त्री पणशीकर) ह्यांनी अर्जुनासारखे आपणही आज हतबल संभ्रमित आहोत आपल्याला गीता कशी मार्गदर्शन करते,मन कसे आहे त्यावर संयम कसा पाहिजे ह्याबद्दल सहज सुंदर शब्दांत आपले विचार मांडले.श्री गोविंदांनंद न्यासाच्या

गीताप्रचाराच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. विष्णुसहस्रनामाच्या पठणाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. नंतर कॉफीपान करुन सगळे घरी परतले. सर्वांना एकत्र येण्याचा,प्रवासाचा,गीता म्हणण्याचा आनंद घेता आला. श्री. मुळे व त्यांच्या कुटुंबीयांनी दरवर्षी फार्महाऊसवर गीताजयंती ला पठणासाठी आमंत्रण दिले. त्यांच्या आदरातिथ्याने सर्वांचेच मन भरून आले. सर्वजण खूप खूष ,आनंदी व प्रसन्न झाले.


गीता अध्ययन सांगता समारोह


Ashadhi Ekadashi Bhagwadgeeta Pathan
Tuesday 20th July 2021


गोविंदानंद सरस्वती न्यास वर्धापन दिन


संथा

आज आपल्याला श्री. गोविंदानंद सरस्वती न्यास संस्थेच्या कार्याची व कै. श्री. वामन गणेश नवरे यांना गीता वर्ग सुरू करण्यासाठी शंकराचार्य यांची मिळालेली प्रेरणा याबद्दल संस्थेच्या विश्वस्त डॉ. सौ. विनीताताईंनी माहिती दिली आहे.


मनाची शांतता व शुद्ध वातावरण निर्मितीसाठी आमच्या संस्थेच्या गीता वर्गात आम्ही सुरुवातीला आद्य शंकराचार्यांचे निर्वाणषट्क व श्री महाप्रभुवल्लभाचार्यांचे श्री मधुराष्टकम् म्हणतो. हे दोन्हीही आपल्याला नेटवर मिळतात. पण चाल वेगवेगळी असते. आमच्या संस्थेच्या गीताव्रती, गीताशिक्षिका आणि संगीतविशारद सौ. अनघा विद्वांस यांच्या आवाजात आपण हे दोन्ही ऐकणार आहोत.

निर्वाणषटक स्तोत्र
अधरम मधुरम

प्रत्यक्ष गीता अध्याय सुरू करण्यापूर्वी तीन वेळा ओम(om) चा उच्चार ,नंतर गीताध्यानाचे ओम पार्थायपासून श्लोक म्हणायचे असतात. हे श्लोक गीतेच्या पुस्तकात सुरुवातीस आहेत. संस्थेच्या विश्वस्त सौ. रेखाताई उटगीकर यांनी हे श्लोक म्हटले आहेत.

पार्थाय प्रतिबाधिताम्

भगवद्गीतेची संथा घेण्याचे महत्त्व विशद करणारी प्रस्तावना खालील ऑडिओ क्लिप मध्ये पाठवीत आहोत

प्रस्तावना
भगवद्गीता अध्याय १ संपूर्ण
भगवद्गीता अध्याय १ संथा
श्लोक १ - ५
श्लोक ६ - १०
श्लोक ११ - १५
श्लोक १६ - २०
श्लोक २१ - २५
श्लोक २६ - ३०
श्लोक ३१ - ३५
श्लोक ३६ - ४०
श्लोक ४१ - ४४
श्लोक ४५ - ४७
भगवद्गीता अध्याय १ अर्थ
भगवद्गीता अध्याय २ संपूर्ण
भगवद्गीता अध्याय १ संथा
श्लोक १ - ५
श्लोक ६ - १०
श्लोक ११ - १५
श्लोक १६ - २०
श्लोक २१ - २५
श्लोक २६ - ३०
श्लोक ३१ - ३५
श्लोक ३६ - ४०
श्लोक ४१-४५
श्लोक ४६-५०
श्लोक ५१-५५
श्लोक ५६-६०
श्लोक ६१-६६
श्लोक ६७-७२
भगवद्गीता अध्याय २ अर्थ
भगवद्गीता अध्याय ३ संपूर्ण
भगवद्गीता अध्याय ३ संथा
श्लोक १ - ५
श्लोक ६ - १०
श्लोक ११ - १५
श्लोक १६ - २०
श्लोक २१ - २५
श्लोक २६ - ३०
श्लोक ३१ - ३५
श्लोक ३७ - ४३
भगवद्गीता अध्याय ३ अर्थ
भगवद्गीता अध्याय ४ संपूर्ण
भगवद्गीता अध्याय ४ संथा
श्लोक १ - ५
श्लोक ६ - १०
श्लोक ११ - १५
श्लोक १६ - २०
श्लोक २१ - २५
श्लोक २६ - ३०
श्लोक ३१ - ३७
श्लोक ३८ - ४२
भगवद्गीता अध्याय ४ अर्थ
भगवद्गीता अध्याय ५ संपूर्ण
भगवद्गीता अध्याय ५ संथा
श्लोक १ - ५
श्लोक ६ - १०
श्लोक ११ - १५
श्लोक १६ - २०
श्लोक २१ - २५
श्लोक २६ - २९
भगवद्गीता अध्याय ५ अर्थ
भगवद्गीता अध्याय ६ संपूर्ण
भगवद्गीता अध्याय ६ संथा
श्लोक १ - ५
श्लोक ६ - १०
श्लोक ११ - १५
श्लोक १६ - २०
श्लोक २१ - २५
श्लोक २६ - ३०
श्लोक ३१ - ३५
श्लोक ३६ - ४०
श्लोक ४१ - ४५
श्लोक ४६ - ४७
भगवद्गीता अध्याय ६ अर्थ
भगवद्गीता अध्याय ७ संपूर्ण
भगवद्गीता अध्याय ७ संथा
श्लोक १ - ५
श्लोक ६ - १०
श्लोक ११ - १५
श्लोक १६ - २०
श्लोक २१ - २५
श्लोक २६ - ३०
भगवद्गीता अध्याय ७ अर्थ
भगवद्गीता अध्याय ८ संपूर्ण
भगवद्गीता अध्याय ८ संथा
श्लोक १ - ५
श्लोक ६ - १०
श्लोक ११ - १५
श्लोक १६ - २०
श्लोक २१ - २५
श्लोक २६ - २८
भगवद्गीता अध्याय ८ अर्थ
भगवद्गीता अध्याय ९ संपूर्ण
भगवद्गीता अध्याय ९ संथा
श्लोक १ - ५
श्लोक ६ - १०
श्लोक ११ - १५
श्लोक १६ - २०
श्लोक २१ - २७
श्लोक २८ - ३४
भगवद्गीता अध्याय ९ अर्थ
भगवद्गीता अध्याय १० संपूर्ण
भगवद्गीता अध्याय १० संथा
श्लोक १ - ५
श्लोक ६ - १०
श्लोक ११ - १५
श्लोक १६ - २०
श्लोक २१ - २५
श्लोक २६ - ३०
श्लोक ३१ - ३६
श्लोक ३७ - ४२
भगवद्गीता अध्याय १० अर्थ
भगवद्गीता अध्याय ११ संपूर्ण
भगवद्गीता अध्याय ११ संथा
श्लोक १ - ५
श्लोक ६ - १०
श्लोक ११ - १५
श्लोक १६ - १९
श्लोक २० - २३
श्लोक २४ - २७
श्लोक २८ - ३१
श्लोक ३२ - ३५
श्लोक ३६ - ३९
श्लोक ४० - ४३
श्लोक ४४ - ४७
श्लोक ४८ - ५१
श्लोक ५१ - ५५
भगवद्गीता अध्याय ११ अर्थ
भगवद्गीता अध्याय १२ संपूर्ण
भगवद्गीता अध्याय १२ संथा
श्लोक १ - ५
श्लोक ६ - १०
श्लोक १२ - १५
श्लोक १६ - २०
भगवद्गीता अध्याय १२ अर्थ
भगवद्गीता अध्याय १३ संपूर्ण
भगवद्गीता अध्याय १३ संथा
श्लोक १ - ५
श्लोक ६ - १०
श्लोक ११ - १५
श्लोक १६ - २०
श्लोक २१ - २५
श्लोक २५ - ३०
श्लोक ३१ - ३४
भगवद्गीता अध्याय १३ अर्थ
भगवद्गीता अध्याय १४ संपूर्ण
भगवद्गीता अध्याय १४ संथा
श्लोक १ - ५
श्लोक ६ - १०
श्लोक ११ - १५
श्लोक १६ - २०
श्लोक २१ - २४
श्लोक २५ - २७
भगवद्गीता अध्याय १४ अर्थ
भगवद्गीता अध्याय १५ संपूर्ण
भगवद्गीता अध्याय १५ संथा
श्लोक १ - ५
श्लोक ६ - १०
श्लोक ११ - १५
श्लोक १६ - २०
भगवद्गीता अध्याय १५ अर्थ
भगवद्गीता अध्याय १६ संपूर्ण
भगवद्गीता अध्याय १६ संथा
श्लोक १ - ५
श्लोक ६ - १०
श्लोक ११ - १५
श्लोक १६ - २०
श्लोक २१ - २४
भगवद्गीता अध्याय १६ अर्थ
भगवद्गीता अध्याय १७ संपूर्ण
भगवद्गीता अध्याय १७ संथा
श्लोक १ - ५
श्लोक ६ - १०
श्लोक ११ - १५
श्लोक १६ - २०
श्लोक २१ - २५
श्लोक २६ - २८
भगवद्गीता अध्याय १७ अर्थ
भगवद्गीता अध्याय १८ संपूर्ण
भगवद्गीता अध्याय १८ संथा
श्लोक १ - ५
श्लोक ६ - १०
श्लोक ११ - १५
श्लोक १६ - २०
श्लोक २१ - २५
श्लोक २६ - ३०
श्लोक ३१ - ३५
श्लोक ३६ - ४०
श्लोक ४१ - ४५
श्लोक ४६ - ५०
श्लोक ५१ - ५५
श्लोक ५६ - ६०
श्लोक ६१ - ६५
श्लोक ६६ - ७०
श्लोक ७१ - ७५
श्लोक ७६ - ७८
भगवद्गीता अध्याय १८ अर्थ

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गोविंदानंद सरस्वती न्यासा चे पुढचे पाऊल

व्हॉट्सऍप ऑनलाईन भगवद्गगीता पठण वर्ग

गोविंदान॔द सरस्वती न्यासाच्या गीताध्यायी व गीता शिक्षिका सौ.रेखा उटगीकर आणि सौ.मंजुषा बुरुज वाले यांच्या पुढाकाराने ऑनलाइन व्हॉट्सऍप भगवद्गीता पठण वर्ग सुरू करण्यात आले . पहिल्या ग्रुप मध्ये साडेसातशे गीताध्यायींनी भगवद्गीतेची संथा घेतली. दुसऱ्या ग्रुप मध्ये सतराशे गीताध्यायींनी भगवद्गीतेची संथा घेतली . तिसऱ्या ग्रुप मध्ये पंधराशे गीताध्यायींनी संथा घेतली. चौथ्या ग्रुपचे १५३० गीताध्यायीं चे शिक्षण सुरू आहे. पहिल्या ग्रुपची संथा नोव्हेंबर मध्ये संपली. दुसऱ्या व तिसऱ्या ग्रुपची संथा मार्चमध्ये संपली. प्रत्येक ग्रुपला प्रत्येक अध्यायाचा अर्थ सारांश रूपाने पाठविण्यात आला. या सर्व कामांमध्ये सौ. सुजाता शेंबेकर, सौ. भारती महाजन, सौ .विजया प्रभू सौ अर्चना वाणी, सौ अनघा विद्वांस सौ. अनिता पुराणिक व सौ. श्रुती हेरवाडकर यांची मोलाची मदत झाली. संपूर्ण अठरा अध्यायांची संथा सौ. रेखा उटगीकर यांनी अतिशय उत्तम रीतीने ऑडिओ रेकॉर्डिंग च्या स्वरूपात त्यांच्या आवाजामध्ये तयार करण्याचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले. त्यांची संथा ऑडिओ स्वरूपात ऐकताना त्यांच्यासमोर बसून संथा घेत आहोत असाच अनुभव येतो .प्रत्येक अध्यायाचा , आपल्या जीवनामध्ये व स्वभावामध्ये बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने व आपण काय शिकले पाहिजे यातून या दृष्टीने अतिशय सोप्या शब्दांमध्ये सारांश रूपाने अर्थ सांगण्याचे शिवधनुष्य सौ. श्रुती हेरवाडकर यांनी यशस्वीपणे पेलले आहे .व्हाट्सअप ऑनलाईन भगवद्गीता पठण वर्ग सुरू करण्याची मूळ कल्पना मंजुषा बुरुजवाले यांची आहे .या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी त्यांनी खूप कष्ट केले. न्यासाचे विश्वस्त सौ. विनिता ताई केतकर आणि श्रीयुत विश्वास नवरे यांनी या उपक्रमाला प्रोत्साहन व पाठिंबा दिला त्यामुळे सर्व गीताध्यायींचा काम करण्याचा उत्साह द्विगुणित झाला . आजच्या covid-19 च्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनेकांना जगण्याची उमेद देणारा व प्रतिकूल परिस्थितीमध्ये मन आनंदी आणि शांत ठेवून जगण्याची मानसिक शक्ती देणारा हा वर्ग समाजामध्ये लोकप्रिय होत आहे. व्हाट्सअप ऑनलाईन भगवद्गीता पठणाच्या या वर्गामध्ये सहभागी झालेल्या अनेक गीताध्यायींनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आहे .वानगीदाखल एक-दोन मनोगते आपणासमोर ठेवत आहोत. व्हाट्सअप ऑनलाइन वर्गांच्या माध्यमातून भगवद्गीता घराघरात पोचण्याचे कार्य सुरू आहे आणि त्या निमित्ताने गोविंदानंद सरस्वती न्यासाचे संस्थापक कै. श्रीयुत नवरे गुरुजींची, *घराघरात गीता पोचवा* ही तळमळ काही प्रमाणात पूर्ण होत आहे याचे सर्व गीताध्यायींना समाधान आहे. उत्तरोत्तर या वर्गांच्या माध्यमातून भगवद्गीतेचा प्रसार होत राहावा व भगवद्गीता घराघरात पोहोचावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

मनोगत

१) मी सौ स्निता वालावलकर आपणां सर्व गीताव्रतींना नमस्कार करते. कोरोना काळात विचारपूर्वक आपण या माध्यमाद्वारे संथा देण्याचे काम हाती घेतलेत या बद्दल आभार.माझ्यासारख्या गृहिणींना घरी राहून आपल्या वेळेनुसार याचा लाभ घेणे शक्य झाले. आपण समोरासमोर नाही याचा पूर्ण विचार करून शांत व सुस्पष्टपणे संथा दिलीत.तसेच या ज्ञानरूपी महासागरातील सारांशरूपी मोती सुलभतेने आमच्या ओंजळीत टाकलेत.खूप खूप आभार. ह्या पुढील वाटचालीत वारंवार आपल्या मार्गदर्शनाची गरज भासेल तेव्हां आपणांशी संपर्क करू शकते का? असेल तर योग्य वेळ कोणती? हे कळले तर बरे होईल. आपले गुरू-शिष्यांचे नाते असेच चालू राहावे हीच ईच्छा. पुढे कधीही प्रत्यक्षात भेटणे शक्य झाल्यास आनंद वाटेल.पुनश्च सर्वांना अभिवादन. जय श्रीकृष्ण.


३) रेखाताई, मंजुषा ताई, श्रुती ताई, सुजाता ताई, अनिता ताई,
सर्व गीताव्रती गुरुजनांना दंडवत आणि आपण दिलेल्या गीता संथे बद्दल मनापासून धन्यवाद!!
गोविंदानंद सरस्वती न्यासाच्या सर्वच चमूचे हा उपक्रम यशस्वीपणे
राबविल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील उपक्रमांसाठी हार्दिक शुभेच्छा


३) नमस्कार गीतावाचन व पठण वर्ग चालू करुन खुप आनंद झाला. खुप दिवसां पासून गीता शिकायचे मनात होतेच. तुम्हा सर्वांमुळे हे शक्य होत आहे. तुमच्या सर्व टिम ला खुप खुप धन्यवाद. मी रोज नित्यनेमाने आपले ऑडिओ ऐकते व त्या प्रमाणे म्हणायचा प्रयत्न ही करते. हे कार्य असेच चालू रहावे ही विनंती. माझ्या कडून काही मदत हवी असल्यास मी आनंदाने करीन. धन्यवाद

सौ श्रुती हेरवाडकर

आपल्या सहजसुंदर शैलीमध्ये भगवद्गीतेच्या 18 अध्यायांचा सारांश रूपाने सोप्या शब्दात अर्थ विशद करण्याची धुरा सांभाळली.

सौ रेखा उटगीकर

संपूर्ण अठरा अध्यायांच्या संथेचे ऑडिओ रेकॉर्डिंग आपल्या सुश्राव्य आणि सुस्पष्ट आवाजामध्ये करण्याची धुरा यशस्वीपणे सांभाळली.

सौ मंजुषा बुरुजवाले

व्हॉट्सऍप ऑनलाईन भगवद्गीता पठण वर्गाची संकल्पना स्वकष्टाने व इतर गीताअध्यायीं च्या मदतीने यशस्वीपणे अमलात आणली.


| कृष्ण गाथा |


| शंकराचार्य जयंती |

 
वैशाख शुद्ध पंचमी म्हणजे आद्य शंकराचार्य यांचा जन्म दिवस. सद्य परिस्थितीत आपापल्या घरी गोविंदानंद सरस्वती न्यासाच्या सर्व गीताध्यायींनी निर्वाणषटक स्तोत्राचे पठण केले.
शंकराचार्य म्हणजे ज्ञान व भाव यांचा संगम आहे.सनातन धर्मा चे पुनरुज्जीवन करण्याचे त्यांचे अवतार कार्य वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी पूर्ण झाले. आद्य शंकराचार्य यांना त्यांच्या जयंतीनिमित्त सविनय प्रणाम.

| मनोगत |

 
नमस्कार ,
आज २३एप्रिल, नेहमी वर्गात गुरुजींच्या आठवणी सांगितल्या जातात. पण आज लॉकडाउनमुळे आपण घरीच स्मरण केले. गुरुजींचा आवडता १६वा अध्याय म्हणून श्रद्धांजली अर्पण केली.
२००१० साला पासून‌ आपणास गुरुजींचा सहवास लाभला.गीतेचे ७००श्लोक पाठ करण्याचे शिवधनुष्य त्यांच्याच प्रेरणेने उचलले. शृंगेरीला परीक्षा दिली.आपल्या जीवनाला एक वेगळेच वळणलाभले.चार ठिकाणी राहणाऱ्या चारचारजणी आपण एकत्र आलो. गीतेचे क्लास घेऊ लागलो.आपला एक अनोखा ग्रुप जमला.गीता म्हणणे,त्यासाठीजिथे बोलावतील तिथे जाणे निरपेक्षपणे आपले काम करणे यातील अप्रतिम आनंद आपण अनुभवत आहोत. जीवनाला एक वेगळीच दिशा देणाऱ्या श्रीगुरुजींच्या चरणी आपल्या सर्वांतर्फे मी श्रद्धांजली अर्पण करते. तुमच्या सर्वांच्या भावना अशाच असतील असे मला वाटते.
आज सर्वानी अध्याय(१६वा) वाचल्याचे मला कळवले आहेच. श्रीगुरुजींच्या आशीर्वादाने कार्याची भरभराट होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

| पुण्यस्मरण |

 
गोविंदानंद सरस्वती न्यासाचे ‌संस्थापक आणि‌ संस्कृत चे गाढे अभ्यासक कै. श्री. वामन गणेश नवरे यांची पुण्यतिथी दिनांक २३ एप्रिल २०२० रोजी न्यासाच्या सर्व गीताध्यायींनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
सद्य परीस्थिती मधे आपापल्या घरी गुरुजींचा आवडत्या १६ व्या अध्यायाचे सर्वांनी पठण केले. गुरुजींमूळे भगवद्गीगीतेची ओळख झाली आणि जीवनाला एक वेगळाच आयाम मिळाला. सर्व गीताध्यायींची ही भावना न्यासाच्या जेष्ठ गीताध्यायी सौ.रेखा उटगीकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.

गीता जयंती उत्सव

 
रविवार दिनांक १० डिसेंबर २०११० मार्गशीर्ष शुद्ध एकादशी हा दिवस गीता जयंती निमित्त साजरा करण्यात आला. या निमित्ताने न्यासाच्या गीताध्यायी सौ. अंजली सावले यांच्या कृष्ण प्रीत या स्वरचित काव्य गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांच्या काव्य गायनाने श्रोते मंत्रमुग्ध होऊन गेले.
त्यानंतर न्यासाच्या गीताध्यायी सौ.अनघा विद्वांस यांनी कृष्ण गीता चे गायन उपस्थित गीताध्यायींसह केले.श्री.ज्ञानेश्वर पाटील यांच्या शंखवादनाने वातावरण मंगलमय झाले.सर्व गीताध्यायींनी १, २,१६,१७,११० अध्यायांचे पठण केले.आरती व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. एकूण ११०० गीताध्यायी उपस्थित होते. सौ.मंजुषा बुरुजवाले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्मपक शब्दात केले.विश्वस्त सौ.रेखा उटगीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकमाचे उत्तम नियोजन गीताध्यायी सौ.मंजुषा बुरूजवाले यांनी केले.आभार प्रदर्शन सौ.शुभांगी पुसाळकर यांनी केले.प्रसाद घेऊन समाधानात सर्व गीताध्यायींनी एकमेकांचा निरोप ‌घेतला.

पांडव पंचमी उत्सव

 
गोविंदानंद सरस्वती न्यासा तफॆॅ शुक्रवार दिनांक १ नोव्हेंबर २०११० रोजी वक्रतुंड सभागृहात पांडव पंचमी साजरी करण्यात आली . भगवान श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या धर्मयुद्धात पांडवांनी मिळविलेल्या विजया चा दिवस म्हणजे पांडव पंचमी.तसेच स्वामी गोविंदानंद सरस्वतींचा हा समाधी दिन आहे.त्या निमीत्ताने स्वामींच्या पादुकां चे पूजन व भगवद्गीता ६ अध्याय पठण असा कार्यक्रमाचा आराखडा होता.न्यासाच्या अनेक उद्दीष्टांपैकी एक उद्दीष्ट संस्कृत भाषा प्रसार हे आ